धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा वाढदिवस जिल्हाभरात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.

वाढदिवसानिमित्त धाराशिव शहरातील विविध नगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये शाळेच्या बॅगा, वह्या, पुस्तके तसेच इतर शैक्षणिक साहित्याचा समावेश होता. तसेच अन्नपूर्णा छत्र कार्यालय, धाराशिव येथे अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

“रक्तदान हेच जीवनदान“ या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कळंब येथे वृक्षारोपण करण्यात आले, तर परंडा, वाशी आणि कळंब तालुक्यांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

याशिवाय धारासुरमर्दिनी मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले. तसेच धाराशिव येथील दर्ग्यामध्ये चादर चढविण्याचा धार्मिक कार्यक्रमही संपन्न झाला.

या सर्व कार्यक्रमांना माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेवक खलिफाभाई कुरेशी, रमेश देशमुख, कादरभाई खान, शहराध्यक्ष तथा नगरसेवक बबलूभाई शेख, नगरसेवक सुनील आंबेकर, नगरसेवक पंकज भोसले, नगरसेवक सर्फराज कुरेशी, नगरसेवक अशोक देवकते, नगरसेवक इस्माईल बाबा शेख, नगरसेवक विशाल शिंगाडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहित बागल, जिल्हा सरचिटणीस जुबेर अहमद काझी, अभिजित काळे, सोशल मीडिया विभागाचे ॲड. योगेश सोन्नेपाटील, शहर कार्याध्यक्ष नरसिंह मेटकरी, युवक शहराध्यक्ष रणवीर इंगळे, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष रवी ठेंगल, लीगल सेलचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सुशांत बनसोडे, तुळजापूर विधानसभा युवक अध्यक्ष नवनाथ मोटे, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालिंदर पोळ, सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्षा ज्योतीताई मळाळे, अर्चनाताई अंबूरे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कसबे, अविज मोमीन, बाळासाहेब सुभेदार, प्रवीण लुंगसे, बालाजी मगर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मिलिंद आप्पा पेठे यांच्या संकल्पनेतून अन्नदान कार्यक्रम तसेच नगरपालिका शाळा क्रमांक 12 मध्ये शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. नगरसेविका रूपालीताई सुनील आंबेकर यांच्या वतीने नगरपालिका शाळा क्रमांक 11 मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस इंजि. रामेश्वर पवार यांच्या वतीने आळणी येथील मूकबधिर शाळेत खाऊ वाटप, गरजू नागरिकांना चार्जर वाटप तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

जिल्हाभरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांना कादर खान, अन्वर शेख, सचिन अंधारे, अजिंक्य हिबारे, राणीताई शिंदे  यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. सेवा, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत डॉ. प्रतापसिंह  पाटील यांचा वाढदिवस विविध लोकोपयोगी उपक्रमांनी प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.


 
Top