शिक्षकांच्या हितासाठी राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघटना अखंड पाठीशी राहिल- मा.आमदार श्री बाळाराम पाटील
पनवेल, प्रतिनिधी : राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघाचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन व पुरस्कार प्रदान सोहळा दि. 5 जून 2026 रोजी व्ही. के. हायस्कूल पनवेल येथे मोठ्या उत्साहात व दिमाखदार वातावरणात संपन्न झाले. राज्याच्या विविध जिल्ह्यांतून आलेल्या शिक्षक,शिक्षिका तथा संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे अधिवेशनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष पदी माजी शिक्षक आमदार तथा संघटनेचे संस्थापक मार्गदर्शक बाळाराम पाटील तर अध्यक्ष स्थानी संघटनेचे राज्याध्यक्ष अनिल नाचपल्ले हे होते. प्रमुख उपस्थितांमध्ये , लोहारा/ उमरगा मतदार संघाचे विधानसभा सदस्य आमदार प्रवीण स्वामी, पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्यासह संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल नाचपल्ले, सरचिटणीस संतोष भोजने, उपाध्यक्ष सुखदेव भालेकर, राजेंद्र खैरनार, संपर्कप्रमुख मंगेश सुवर्णकार, प्रसिद्धीप्रमुख धनाजी घरत, लहू राक्षे, रायगड जिल्हाध्यक्ष धनाजी घरत, खाजगीप्रमुख राजन पाटील, राज्यसंघटक प्रशांत शेवाळे, प्राध्यापक विभागप्रमुख श्रीम. प्रतिभा पगार , महिला अध्यक्षा रेखाताई सुडे , महिलाचिटणीस विनया जाधव कार्याध्यक्ष लीना मगर,नाशिक विभागप्रमुख संदीप गीते, छ.सांभाजीनगर विभाग प्रमुख विजयकुमार तेलंग, रायगड पदाधिकारी रवी पाटील, उमेश पाटील, विद्याधर पाटील, भरत गुरव यांच्यासह सर्व जिल्हाध्यक्ष तसेच राज्यभरातील विभागीय, जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.
प्रथमतः 5 जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तुळशीच्या रोपट्याला मान्यवरांच्या हस्ते जलदान करण्यात येऊन त्यानंतर सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले ..
आमदार बाळाराम पाटील यांची रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभाग चेअरमन पदी फेर निवड झाल्यामुळे संघटनेच्या वतीने भव्य असा सत्कार करण्यात आला
सदर अधिवेशनात शिक्षक, विद्यार्थी, शाळा, शिक्षण व्यवस्था व सामाजिक बांधिलकी यांच्याशी संबंधित एकूण 30 महत्त्वपूर्ण ठराव मांडून त्यास उपस्थितांची मंजुरी घेण्यात आली. उपस्थित प्रतिनिधींनी हात उंचावून एकमताने सर्व ठरावांना अनुमोदन दिले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात शिक्षकांच्या न्याय्य मागण्या, शैक्षणिक प्रश्न, विद्यार्थ्यांचे हित आणि शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांबाबत संघटितपणे लढा उभारण्याची गरज व्यक्त केली. संघटनेच्या माध्यमातून शासन दरबारी प्रभावीपणे प्रश्न मांडून ते सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिली.
राज्यातील ओबीसी बहुजन शिक्षकांना एकत्र आणून त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व संघटनात्मक प्रश्नांसाठी भक्कम व्यासपीठ निर्माण करण्याच्या दृष्टीने हे अधिवेशन ऐतिहासिक ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी राज्यातील आदर्श व गुणवंत शिक्षिका शिक्षक यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार, क्रांतीसुर्य महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार, डॉ. पंजाबराव देशमुख ओबीसीरत्न पुरस्कार अशा 3 पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अधिवेशनाचे सूत्रसंचालन महाराष्ट्रातील प्रसिद्ध सूत्रसंचालक जतीन कदम व प्रतिभा क्षीरसागर/ कदम या उभयंतानी आपल्या बहारदार शैलीत केले तर आभार सुखदेव भालेकर यांनी मांडले.
 
Top