तुळजापूर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हगलूर येथे आज दिनांक 15 जून 2026 रोजी इयत्ता पहिली प्रवेशास पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले सर्व विद्यार्थ्यांची गावातून प्रवेश फेरी काढण्यात आली तसेच शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोहर घुगे व उपाध्यक्ष सचिन घुगे यांच्या हस्ते मोफत गणवेश व मोफत पाठ्यपुस्तक यांचे वाटप करण्यात आले. तसेच नवागत विद्यार्थी व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गणेश घुगे व खामदेव घुगे यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आला.
तसेच शाळेचे मुख्याध्यापक गणेश बळे व शिक्षिका संगीता कोरके यांच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी कार्यक्रम यशस्वीतेसाठी व साफसफाईसाठी कलिमा सय्यद यांचे सहकार्य लाभले .सदर कार्यक्रमातून सर्व विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला.
