तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील मंगरूळ येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत नवगतांची स्वागत शैक्षणिक साहित्य खाऊ वाटप करून करण्यात आले. नवगत यावेळी मधुरा मकरंद लबडे तिचा प्रथम वाढदिवस असल्याने हीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कन्या प्रशाला मंगरूळ येथे प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, खाऊ वाटप करून चिमुकल्यांचा आनंद द्विगुणित केला. त्यानिमित्ताने यत्ता पहिली वर्गामध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य स्वागत म्हणून गुलाबाचे फुल आणि खाऊ दिला येणाऱ्या सर्व पालकांचे सुद्धा यावेळी स्वागत करण्यात आले. यावेळी शिक्षक शिक्षक तर कर्मचारी आणि पालक उपस्थित होते. प्रवेशाचा सोहळा आनंदमय वातावरणात पार पडला.
