तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील मौजे सांगवी (मांडी) येथील स्वस्त धान्य दुकानामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचे धान्य वितरित केले जात असुन तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, स्वस्त धान्य दुकानातून पुरविण्यात येणारा गहू अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून तो जनावरांनाही खाऊ घालण्यायोग्य नसल्याचा दावा करण्यात आला आहे. या धान्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असून विषबाधा होण्याचा धोका देखील व्यक्त करण्यात आला आहे.
तक्रारदारांनी सांगवी (मांडी)सह तुळजापूर तालुका व धाराशिव जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून वितरित होणाऱ्या धान्याची तपासणी करण्याची मागणी केली आहे. तसेच निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवठा करणाऱ्या संबंधित अधिकारी व पुरवठादारांवर कठोर कारवाई करून नागरिकांना दर्जेदार धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी धनाजी कुरूद यांनी निवेदनातून करण्यात आली आहे.
%20%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2%20%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%20%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%20%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%20.jpg)