मुरुम (प्रतिनिधी)- मुरुम येथील माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक यशाची परंपरा कायम राखत डी. फार्मसीच्या परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे, या निकालात विद्यार्थिनींनी बाजी मारत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. डी. फार्मसी प्रथम वर्षाचा निकाल 92.30 टक्के, तर द्वितीय वर्षाचा निकाल 95.23 टक्के लागला आहे. डी. फार्मसी प्रथम वर्ष सन 2025-26 च्या परीक्षेत लोणी हुमा बेगम हिने 84.20 टक्के गुण मिळवून प्रथम, कांबळे प्रिया 74.50 टक्के द्वितीय, शेळके सुप्रिया 71.60 टक्के तृतीय क्रमांक मिळविला.

 डी. फार्मसी द्वितीय वर्ष सन 2024-25 च्या परीक्षेत मुस्कान कारभारी 88.18 टक्के प्रथम, आरती दुधभाते 80.55 टक्के द्वितीय, साक्षी पाटील 80.36 टक्के तृतीय, वैष्णवी कटारे 73.91 टक्के चतुर्थ, तर शितल कटारे 73.46 टक्के पाचवा क्रमांक पटकाविला. या यशाबद्दल गुणवंतांचा सत्कार जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या हस्ते शाल, पुष्पहार घालून शनिवारी (ता. 20) रोजी करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. महेश्वर होगाडे, नगरसेवक सूर्यकांत जाधव, प्रा. डॉ. रवि आळंगे,  उपप्राचार्य योगेश पाटील, प्रा. सुदीप ढंगे, प्रा. प्रियंका काजळे, प्रा. वैष्णवी पाटील, प्रा. विनंती बसवंतबागडे, प्रा. रफिक शेख, प्रा. हर्षद बदोले, मल्लिकार्जुन स्वामी, किशोर कारभारी, हर्ष गायकवाड आदी उपस्थितांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थिनींनी मिळवलेल्या या यशाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

 
Top