परंडा (प्रतिनिधी)-  परंड्याचे सुपुत्र जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ प्रा. डॉ.गजानन राशीनकर यांचा जगातील टॉप शास्त्रज्ञांत समावेश झाल्या बद्दल डॉ. राशीनकर यांचा भाजपा संपर्क कार्यालयात भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

परंडा येथील असलेले प्रा. डॉ. गजानन राशीनकर हे शिवाजी विद्यापीठात आघाडीचे संशोधक व रसायनशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असून त्यांनी अनेकवेळा सेट नेट परीक्षा उत्तीर्ण होण्याचा विक्रम केलेला आहे. डॉ. राशीनकर यांच्या महिलांच्या स्तनाच्या कर्करोगावरील ‌‘हायपरथर्मिया' ‌‘चुंबकीय नॅनो कणांची निर्मिती' या संशोधनाला भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय युके पेटंट प्राप्त झाले आहे. या संशोधनामुळे शस्त्रक्रिया व जखमेविना उपचार करणे शक्य झाले असून स्तनाच्या कर्करोगावरील उपचारात माता भगिनींची किमोथेरीच्या जीवघेण्या त्रासातून मुक्तता होणार आहे. नॅनो मेडिसीन यात त्यांनी क्रांतिकारी संशोधन केले आहे. 

संशोधन क्षेत्रात पर्यावरणपूरक पद्धतीने नवीन रासायनिक संयुगे बनवणे, कॅन्सर प्रतिबंधक संयुगे जैविक दृष्ट्या सक्रिय रेणूंचे संश्लेषण या विषयावर त्यांचे यांचे कार्य उल्लेखनीय आहे. डॉ. गजानन राशीनकर यांचा भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी फेटा बांधून व शाल पुष्पहार घालून त्यांचा सत्कार केला. 

यावेळी भाजपा शहराध्यक्ष उमाकांत गोरे, परंडा नगरपरिषदचे उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, नगरसेवक रमेशसिंह परदेशी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. जहीर चौधरी, ॲड. अनंत राशीनकर, ॲड. तानाजी गरड, कृष्णा चैतन्य, धनंजय काळे, मनोहर पवार, गौरव पाटील, आकाश मदने तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

 
Top