भूम (प्रतिनिधी)- मतदार शुध्दीकरण प्रक्रिया अभियान जिल्ह्यात परंडा विधान सभा क्षेत्रात चांगले झाले भविष्यात येथे भाजपचाच आमदार असेल असा विश्वास प्रदेश सरचिटणीस सुनिल राणे यांनी व्यक्त केला.
परंडा विधान सभांतर्गत भूम येथिल यश मंगल कार्यालयात मतदार शुद्धीकरण आढावा बैठक माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी , जि प अध्यक्ष अर्चनाताई पाटील, एस आय आर मराठवाडा संयोजक नितीन काळे, परंडा विधानसभा प्रमुख बाळासाहेब क्षिरसागर , विधानसभा अध्यक्ष सुरेश कवडे आदिंच्या उपस्थितीत पार पडली.
या दरम्यान अभियानाची रूपरेषा, बूथस्तरावरील नियोजन, कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्या, जनसंपर्काची दिशा, अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक कार्यकर्त्याने संघटन अधिक बळकट करत अभियान यशस्वी करण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. बैठकिसाठी जि. उपाध्यक्ष महादेव वडेकर, तालुकाध्यक्ष संतोष सुपेकर, महिला जि. उपाध्यक्ष लता गोरे, तालुकाध्यक्ष स्वाती तनपुरे, शहर अध्यक्ष बाबासाहेब वीर, सिद्धार्थ जाधव आदिनी परीश्रम घेतले.
