धाराशिव (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा पतंजली समितीतर्फे जिल्हाभर विविध ठिकाणी योगाभ्यास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुख्य कार्यक्रम तुळजाभवानी स्टेडियम येथे उत्साहात पार पडला.

मुख्य कार्यक्रमात योगशिक्षक तथा पतंजली स्वाभिमान ट्रस्टचे राम ढेरे आणि रविजीत देडे यांनी उपस्थितांना योगाचे महत्त्व सांगत विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून घेतले. तसेच जिल्हा सत्र न्यायालय येथे पतंजली तालुका प्रभारी अनुरथ नागटिळक व बालाजी बोंदर, पोलीस अधीक्षक कार्यालय येथे रविंद्र कुदळे, कळंब येथे शशीकुमार भातलवंडे, तर भूम येथे भोपलकर यांनी योगाभ्यासाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांमध्ये अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, युवक-युवती तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत योगाचे महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी अँड. व्यंकट गुंड पाटील मल्हारी माने, सुर्यकांत आनंदे, विजय बागल, प्रकाश भुरे, गुणवंत काकडे, रमेश फडकुले, अनिल देशमाने, उद्धव भोसले, दिगंबर आंबेकर, शंकर गोरे आणि अवधूते यांची प्रमुख उपस्थिती होती. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून नियमित योगाभ्यासाचा संदेश देत निरोगी जीवनशैलीचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.


 
Top