धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे लोकप्रिय नेते तथा  खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त (दि.19)भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा धाराशिव यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीस प्रोत्साहन देण्यासाठी शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय सा.हित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम राबविण्यात आला. धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीने वाढदिवसाचे औचित्य साधून नगर परिषद शाळा क्र.8 व 14 धाराशिव येथे विद्यार्थ्यांना वह्या, पेन, तसेच इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी मन लावून शिक्षण घेऊन आपल्या कुटुंबाचे, गावाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन करण्यात आले. 

कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी सांगितले की, वाढदिवस साजरा करताना केवळ औपचारिक कार्यक्रम न करता समाजोपयोगी उपक्रम राबविणे ही काळाची गरज आहे. शिक्षण हा समाजाच्या प्रगतीचा पाया असून विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे हे प्रत्येकाचे सामाजिक कर्तव्य आहे. त्याच भावनेतून हा उपक्रम काँग्रेस पक्ष राबवित आहे. या प्रसंगी राहुल गांधी यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. देशातील युवक, विद्यार्थी, शेतकरी, कामगार आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठविला आहे. विज्ञानवादी देश  बनावा हा विचार घेऊन पुढे चालणारे व साऱ्या देशाची आशा असलेले संघर्षमय व्यक्तिमत्व म्हणजे खासदार राहुल गांधी आहेत.

खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मदत मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शाळेच्या वतीने या उपक्रमाचे कौतुक केले. शिक्षण हीच समाज परिवर्तनाची खरी ताकद आहे या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर प्रशांत पाटील,राजेंद्र शेरखाने, खलील सय्यद ,अग्निवेश शिंदे,नगर सेवक अझर पठाण,मेहबूब पटेल,धनंजय राऊत, अंकुश पेठे,अभिषेक बागल,वसंत मडके,बाबा मोमिन,सरफराज काझी,पोपट शिंदे,खालेद पटेल,जावेद काझी,आरेफ मुलांनी ,अज्जूभाई,नियमात महदी,मुईब शेख, न .प शाळा क्र 8 व 14 चे मुख्याद्यापक नईम सर व सर्व शिक्षवृन्द उपस्तित होते. उपस्थितांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे लोकप्रिय नेते तथा विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी, दीर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त करून शिक्षक, विद्यार्थी  यांनी आयोजक धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी चे समाजोपयोगी शालेय उपक्रम राबविण्यात आल्याबद्दल आभार व्यक्त केले.


 
Top