भूम (प्रतिनिधी)- कै.विलासराव रोकडे फाउंडेशन संचलित स्वस्त मानस व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र भूम यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 23/ 6/ 26 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरसोली या ठिकाणी नवोदयच्या परीक्षेमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर अशा व्यक्तींना आपल्या मुलांच्या शैक्षणिक साहित्याची आवश्यकता ही बाब जाणून घेऊन भूम नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक नवनाथ रोकडे यांनी आपल्या स्वखर्चातून आरसोली येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
आज पाऊस नसल्याकारणाने शेतकरी हा हतबल झाला आहे परंतु आपल्या पाल्याचे शिक्षण थांबणार नाही व आपला पाल्य शिक्षणापासून वंचित राहणार नाही हा ध्यास मनामध्ये घेऊन आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. हा मानस मनामध्ये ठेवून आज ग्रामीण भागामधील आरसोली या जिल्हा परिषद शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या ठिकाणी संस्थेचे समुपदेशक विनोद वाघमारे यांनी सर्व मुलांना निर्व्यसनी व आपल्या पुढील शैक्षणिक व कौटुंबिक गोष्टीवरती कशा पद्धतीने मात करणे गरजेचे आहे. त्यासंबंधी विचार व्यक्त केले या कार्यक्रमाप्रसंगी भूम पंचायत समिती सदस्य काकासाहेब मुंडेकर ,भूम नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक तथा स्वस्त मानस व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक नवनाथ रोकडे, डॉक्टर योगेश दिवटे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भगत, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भगत यांनी केले.
