जागतिक पर्यावरण दिन : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे वृक्षारोपण व निसर्ग संवर्धनाचा संदेश*
धाराशिव दि ५ जून (जिमाका ) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद यांच्या वतीने आज ५ जून,२०२६ रोजी न्यायिक अधिकारी निवासस्थान परिसर,धाराशिव येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.हा कार्यक्रम प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अभिश्री देव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत विविध सामाजिक व पर्यावरणपूरक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.याच परंपरेला अनुसरून या वर्षीही भव्य वृक्षारोपण मोहीम राबवून विविध झाडे लावण्यात आली.तसेच उपस्थितांना व नागरिकांना मानवी जीवनातील झाडांचे महत्त्व आणि निसर्ग संवर्धनाची गरज याविषयी सविस्तर माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती.अभिश्री देव यांच्या हस्ते रोपटे लावून करण्यात आली.या प्रसंगी श्री.ए.एस.आवटे,जिल्हा न्यायाधीश श्री.आर.के.खोमणे,जिल्हा न्यायाधीश,श्री.एन.एल.येवलेकर, तदर्थ जिल्हा न्यायाधीश उस्मानाबाद,श्री.विश्वास करे, विभागीय वन अधिकारी,धाराशिव, श्रीमती.भाग्यश्री पाटील,सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, उस्मानाबाद,श्री.दिपक गांधले,वन परीक्षेत्र अधिकारी,धाराशिव, श्रीमती.पी.व्ही.मेढे,मुख्य न्यायदंडाधिकारी,उस्मानाबाद, श्री.एस.एस.पाटील,सहदिवाणी न्यायाधीश व वरिष्ठ स्तर, उस्मानाबाद,तसेच श्री.एस.एस. पाटील,७ वे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर,उस्मानाबाद यांची प्रमुख उपस्थिती होती.

वृक्षारोपण कार्यक्रमात जिल्हा न्यायालयातील कर्मचारी,विद्युत आणि वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.सर्वांनी मिळून पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली तसेच लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याचा संकल्प केला.
             ****************
 
Top