धाराशिव (प्रतिनिधी)- ऑपरेशन टायगरच्या अनुषंगाने खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात शिवसैनिकात असंतोष असल्यामुळे निंबाळकर यांच्या घराला व ऑफिसला पोलिस संरक्षण दिले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी लोकराज्य बोलताना दिली.
सध्या खासदार ओमराजे निंबाळकर यांना आमदार, खासदार यांच्या प्रमाणे एक बॉडीगार्ड दिला असून, वरून आदेश येताच वाय प्लस सुरक्षा देण्यात येईल असे सांगण्यात आले. ऑपरेशन टायगरच्या अनुषंगाने शिवसेना उबाठा गटाच्या 6 खासदाराना वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह अन्य खासदार यांना सुरक्षा देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने 17 जुनला घेतला आहे. ओमराजे हे सध्या पुण्यात असल्याचे कळते. संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर,ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे व संजय दिना पाटील यांना सुरक्षा दिली आहे. वाय प्लस सुरक्षा श्रेणीत साधारणपणे सशस्त्र सुरक्षा कर्मचारी, वैयक्तिक सुरक्षा अधिकारी सह 24 तास सुरक्षा व्यवस्था दिली जाते. संबंधित व्यक्तीच्या धोक्याच्या आकलनानुसार सुरक्षा यंत्रणा तैनात केली जाते.

