तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानातील व्हीआयपी पास नियमबाह्य पद्धतीने वाटप करण्यात आल्याची तकार माहिती अधिकार सामाजिक कार्यकर्ते जयकुमार नागनाथ पांढरे यांनी मंदिर प्रशासनाकडे केली होती. सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत व्यवस्थापक तथा तहसीलदार माया माने यांनी लेखाधिकारी यांच्या नावे लेखी पत्र देऊन या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

संबंधित प्रकरणात व्हीआयपी पास  पासचे नियमबाह्य वाटप करून मंदिर संस्थानला आर्थिक फटका बसल्याचे नमूद करण्यात आले आहे. याबाबत वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी निष्पक्ष, पारदर्शक आणि सखोल चौकशी होणे अत्यंत आवश्यक असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


 
Top