भूम (प्रतिनिधी)- भूम तालुका राष्ट्रीय काँग्रेस (आय) च्या तालुकाध्यक्षपदी ॲड. सिराज मोगल यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाकडून अपेक्षा व्यक्त होत आहेत.

ॲड. सिराज मोगल हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. ग्रामीण भागापासून शहरापर्यंत पक्षाची ताकद वाढविणे, कार्यकर्त्यांना सक्रिय करणे तसेच जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर भूम तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.

तालुक्यात काँग्रेसचे संघटन अधिक सक्षम करणे, युवक व महिलांना पक्षाशी जोडणे, बूथस्तरावरील यंत्रणा मजबूत करणे तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा विस्तार करण्यासाठी ते विशेष प्रयत्न करणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या निवडीबद्दल काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी ॲड. सिराज मोगल यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली भूम तालुक्यात काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


 
Top