भूम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी कार्यालय भूम येथे नवनियुक्त केंद्रप्रमुखांचा सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून 40 केंद्रप्रमुखांची भरती करण्यात आली यापैकी चार केंद्रप्रमुखांची पदस्थापना भूम तालुक्यात देण्यात आली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या भूम शाखेने गटशिक्षणाधिकारी अनिता जगदाळे यांच्या उपस्थितीत या सर्व केंद्रप्रमुखांचा सत्कार केला.

याप्रसंगी नूतन केंद्रप्रमुख प्रीती वीर, संदीप मोरे, अवताडे, तनमोर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कार्यालयीन विस्तार अधिकारी सूर्यकांत साळुंखे, तालुका संघाचे मार्गदर्शक सोमनाथ टकले तालुकाध्यक्ष संजीवन तांबे, कार्याध्यक्ष दीपक वाळके, कोषाध्यक्ष दत्तात्रय घुले, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष  लक्ष्मी इंगळे-गुंजाळ, अर्चना खोसे-नरके, शोभा काशीद-तांबे, जाधव, स्मिता जंजिरे-ढगे, सारिका राऊत-शिंदे, सुभाष शिंदे, धैर्यशील नरके, जाधव, अधिकराव वाघमारे, काका डोरले, श्रीराम हंगे, शहाजी पंडित, सुनील गुंजाळ, तात्या ढोरे, अनिल दुधाळ, बंडू म्हेत्रे, रवी भोंग, संदीप शिंदे, राजेंद्र बागडे, अशोक नलवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस दत्तात्रय गुंजाळ यांनी केले. तर आभार प्रदर्शन दीपक वाळके यांनी केले.

 
Top