परंडा (प्रतिनिधी)- येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले गजानन शंकरराव मुळे यांची महाराष्ट्र पोलीस दलात 'पोलीस उपनिरीक्षक' (पीएसआय) पदी नुकतीच निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल रोसा येथे 'स्वामिनी कलेक्शन साडी' आणि पत्रकार समीर ओव्हाळ यांच्या वतीने गजानन मुळे यांचा भव्य सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. 

गजानन मुळे यांनी आपल्या कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर हे घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांच्या या निवडीमुळे रोसा व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशाचे कौतुक करण्यासाठी परंडा पोलीस ठाणे येथे दि. 26 जून रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पत्रकार समीर ओव्हाळ, स्वामिनी कलेक्शनचे प्रतिनिधी आणि समीर ओव्हाळ च्या हस्ते गजानन मुळे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी उपस्थितांनी मुळे यांच्या खडतर प्रवासाचे कौतुक करत त्यांना भावी पोलीस अधिकारी म्हणून पुढील सेवाकाळासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. त्यावेळी पंचायत समितीचे सदस्य समाधान नलवडे, संतोष ओव्हाळ, अमित नलावडे, सुदाम ओव्हाळ, गणेश गव्हाळे, समाधान ओव्हाळ, अमित शिंदे, अभिजीत नलवडे, कार्यक्रमाला परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top