धाराशिव (प्रतिनिधी)- अवैध जनावरे कत्तलीसाठी बांधुन ठेवणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेने भूम येथे कारवाई करून 1 लाख 20 हजार रूपयांचे लहान, मोठे जनावरे जप्त केले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मालाविषयी गुन्हे उघडकीस आणणे, पाहिजे फरारी आरोपीची माहिती काढुन कारवाई करिता स्थानिक गुन्हा शाखेचे पथक रवाना होवुन पेट्रोलिंग करीत असतांना पथकास गोपनिय बातमी मिळाली. भुम येथे हाडळ परिसरात प्रकाश चौधरी यांचे शेतात मोकळ्या जागेत कत्तल करण्यासाठी गोवंशीय जातीचे मोठे जनावरे, वासरे बांधलेली आहेत. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने छापा मारला असता नमुद ठिकाणी मोकळ्या जागेत चारा, पाण्याची कसलीही सोय न करता आखुड दोरीने निर्दयपणे वेगवेगळ्या झाडांना, लाकडांना बांधलेली एकुण 9 गोवंशीय जातीचे लहान मोठे जनावरे, वासरे मिळून आली. सदर जनावरांबाबत व त्यांचे मालका बाबत आजुबाजूचे लोंकाकडे विचारपुस केली. त्यावर त्यांनी सांगितले की, मुस्तफा कुरेशी रा. भुम ता. भुम जि. धाराशिव यांचे मालकीचे असुन त्याने जनावरे, वासरे ही कत्तलीसाठी बांधून ठेवलेली आहेत असे सांगितले. त्यावर पथकाने नमुद गोवंशीय जातीच्या 5 जर्शी गाय, 2 कालवड, 1 गिरगाय, 1 खिल्लार असे एकुण 1 लाख 20 हजार रूपये किंमतीचे जनावरांना पोलीस ठाणे भुम येथे हजर केले. यावरुन नमुद आरोपीविरुध्द पोलीस ठाणे भुम येथे गुन्हा नोंदणी क्रमांक 367/2026 प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11(1) (एफ) 11(1)(एच) अन्वये गुन्हा नोदंवला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर,यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि अमोल मोरे, पोह समाधान वाघमारे, बळीराम शिंदे, मपोह शोभा बांगर, पोलीस नाईक अशोक ढगारे, चापोअं दहीहांडे, यांचे पथकाने केली आहे.