धाराशिव (प्रतिनिधी)- पोलीस ठाणे कळंबचे पोलीस निरीक्षक शेख व राज्य उत्पादन शुल्कं विभागाचे पोलीस निरीक्षक हरीभाउ लांडे यांनी सयुक्तं मोहिम राबवुन कार्यवाही करत कळंब शहरामध्ये पाहटेच अवैध रित्या गावठी हातभट्टी तयार करणारे 5 अड्यावर छापा मारला. कार्यवाही दरम्यान एकुण 5 गुन्हे नोंद करण्यात आले असुन आरोपीतांकडुन एकुण 120 लिटर गावठी दारु 2,600 लिटर गुळमिश्रीत रसायन तसेच इतर साहित्यं असा एकुण 1 लाख 4 हजार 750 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करुन सदरचा मुद्देमाल जागीच नाश केला.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शकील शेख, पोलीस नाईक माळवे, पोलीस अंमलदार कदम, भोसले, मोटेगावकर, महीला पोलीस अंमलदार श्रीरसागर तसेच राज्यं उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक हरीभाउ लांडे व त्यांचे स्टाफसह संयुक्त कारवाई करण्यात आली.