अचूकता, पारदर्शकता आणि नेतृत्व; जागतिक स्पर्धेत सतीश मोहगावकर यांची छाप
धाराशिव : अहमदाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक योगासन स्पर्धेत सतीश मोहगावकर यांनी मुख्य ज्युरी (Chief Jury) म्हणून अत्यंत यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली. स्पर्धा कालावधीत त्यांनी तांत्रिक बाबींचे प्रभावी नियोजन व व्यवस्थापन करून स्पर्धेची गुणवत्ता आणि पारदर्शकता कायम राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
योगासन स्पर्धेमध्ये विविध देशांतील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत गुणांकन प्रक्रिया, नियमांचे पालन, परीक्षकांचे समन्वयन तसेच तांत्रिक अडचणींचे निराकरण यांसारख्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या मोहगावकर यांनी अत्यंत कुशलतेने सांभाळल्या.
सतीश मोहगावकर हे महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स संघटनेचे मागिल ३० वर्षांपासून "टेक्निकल डायरेक्टर" म्हणून जबाबदारी पार पडत आहेत. या सोबतच योगासन भारत" ह्या राष्ट्रीय खेळ संघटनेच्या "टेक्निकल कमेटि" चे "कन्व्हेनर" आहेत. आज पर्यंत राष्ट्रीय संघटनेच्या राष्ट्रीय योगासन स्पर्धा, खेलो इंडिया युथ गेम्स, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स, आणि "नॅशनल गेम्स" तसेच मागिल वर्षी झालेल्या एशियन योगासन स्पर्धा ह्या सर्व स्पर्धेत ज्युरी म्हणून कार्य केले आहे. योगासन क्षेत्रातील त्यांचे दीर्घकाळाचे योगदान, तांत्रिक ज्ञान आणि संघटन कौशल्य यामुळे त्यांची मुख्य ज्युरी म्हणून निवड करण्यात आली होती. जागतिक स्तरावरील या स्पर्धेत त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्यामुळे महाराष्ट्रासह देशाचे नाव गौरवले गेले आहे.
या यशाचे श्रेय ते योगासन भारत अध्यक्ष श्री उदित जी सेठ, महासचिव डॉ जयदिप जी आर्य आणि महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ संजय मालपाणी यांना देतात.
धाराशिव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष अतुल अजमेरा, सचिव स्वाती गडदे