धाराशिव  (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीचे नेते  मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 27 जून 2026 रोजी स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह, अळणी, ता. जि. धाराशिव येथे सेवा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत बालगृहातील विद्यार्थ्यांना खाऊ व अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. विशेष मुलांसोबत वाढदिवस साजरा करत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी भाजपा शहर उपाध्यक्ष-स्वप्नील भैय्या शिंगाडे, सम्राट सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष-संजय भाऊ थोरात, प्रथमेश डेंगळे, रोहित वाघमारे, आर्यन गायकवाड, हरी हुलवणे, सिद्धार्थ धावारे, तसेच संस्था चालक शहाजी चव्हाण, मुख्याध्यापक गुरुनाथ थोडसरे, शिक्षिका रेणुका कुदाळे मॅडम, शिक्षक भारत पाटील, अन्य शिक्षकवृंद व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

 
Top