धाराशिव (प्रतिनिधी)- 6 खासदारांनी शिवसेना उबाठा गटाची साथ सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे सक्रीय झाले असुन खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात ते धाराशिव येथे 28 जुन रोजी येऊन त्यांच्या विरोधात रणशिंग फुंकणार आहेत. ठाकरे काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे. आमदार कैलास पाटील हे उबाठा गटाची खिंड लढवीत आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 26 ते 29 जून दरम्यान महाराष्ट्रातील सहा बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. यवतमाळ, वाशिम, हिंगोली, धाराशिव, परभणी आणि शिर्डी या 6 लोकसभा मतदारसंघांत जाऊन ते स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.
नवनियुक्त सर्व तालुका व शहर अध्यक्षांचे काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पक्षसंघटना अधिक मजबूत करून काँग्रेसची विचारधारा जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी हे सर्व पदाधिकारी समर्पितपणे कार्य करतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

