सायकल दिन २०२६ निमित्त संडे ऑन सायकल’ अभियानांतर्गत ७ जून रोजी सायकल रॅली

धाराशिव दि. ४ जून (जिमाका) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धाराशिव, खो-खो खेलो इंडिया सेंटर व क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक सायकल दिवस २०२६ निमित्त आयोजित “संडे ऑन सायकल” या अभियानांतर्गत सायकल रॅलीचे आयोजन धाराशिव येथे दि.७ जून २०२६ रोजी सकाळी ७ वाजता करण्यात आले आहे.या रॅलीमध्ये खेलो इंडिया सेंटर,क्रीडा भारती,श्रीपतराव भोसले हायस्कूल,छत्रपती शिवाजी विद्यालय येथील खेळाडू व विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

“संडे ऑन सायकल”अभियानांतर्गत आयोजित या सायकल रॅलीत धाराशिव शहरातील युवक,युवती,खेळाडू तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन श्रीकांत हरनाळे, जिल्हा क्रीडा अधिकारी,धाराशिव यांनी केले आहे.

सायकल रॅलीचा मार्ग जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) येथून सुरू होऊन गरड हॉस्पिटलपासून उजवीकडे वळण घेऊन देशमुख हॉस्पिटल,एचडीएफसी बँक,महात्मा फुले चौक मार्गे श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे रॅलीचा समारोप (विसर्जन) होणार आहे.
                ***********
 
Top