तुळजापूर (प्रतिनिधी)-  तुळजापूर शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील निर्वासित कुटुंबांच्या अंधारमय जीवनात प्रकाश आणण्याचे मोलाचे कार्य नगरसेविका प्रियंका विजय गंगणे यांनी केले आहे. त्यांच्या स्वखर्चातून 45 निर्वासित कुटुंबांना नवीन वीज कनेक्शन, मोफत वीज मीटर तसेच परिसरात एअरबंच केबल व वीज खांब उभारण्याचे काम पूर्ण करण्यात आले. या कामाचा लोकार्पण सोहळा 20 जून रोजी नगरसेविका प्रियंका गंगणे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.

अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या या कुटुंबांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. नवीन वीज कनेक्शनमुळे घराघरांत प्रकाश पोहोचला असून मुलांच्या शिक्षणासह दैनंदिन जीवनातील अनेक अडचणी दूर झाल्या आहेत. तसेच परिसरात उभारण्यात आलेल्या एअरबंच केबल व वीज खांबांमुळे वीजपुरवठा अधिक सुरक्षित व सुरळीत झाला आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विजय गंगणे नगरसेवक गवळी जयकुमार पांढरे मनोज गवळी वनील हंगरगेकर तानाजी साळुंखे टिंकू हत्तीकर प्रमोद भोरे सचिन वाघमारे उत्कर्ष डोंगरे रवी प्रताप अक्षय माने सचिन काळे रणजीत पाटील बालाजी नाईकवाडी सोनारवाडी आदी मान्यवर उपस्थित होते या कार्याबद्दल परिसरातील नागरिकांनी नगरसेविका प्रियंका गंगणे यांचे आभार मानत त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. “जिथे अनेकजण केवळ आश्वासने देतात, तिथे प्रियंकाताईंनी प्रत्यक्ष कृती करून दाखवली. आमच्या अंधारलेल्या आयुष्यात त्यांनी प्रकाश आणला,“ अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.

 
Top