धाराशिव (प्रतिनिधी)-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात 12 वा आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाच्या योगदिनाची मध्यवर्ती संकल्पना “आरोग्यदायी वृध्दत्वासाठी योग“ अशी होती. 

विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. रमेश चौगुले यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. मेघश्याम पाटील यांनी योगासने आणि प्राणायामाची प्रात्यक्षिके दर्शवून मार्गदर्शन केले. यावेळी ताडासन, पादहस्तासन, भद्रासन, शशांकासन, मांजरी आसन, मकरासन, भुजंगासन, शलभासन, अर्धहलासन, पवनमुक्तासन, शवासन इ. आसने व सूर्यनमस्कार करण्यात आले.  तसेच नाळीशोधन, कपालभाती, शीतली, भ्रामरी इत्यादी प्राणायमांचा सराव करण्यात आला. योग सत्राच्या शेवटी ध्यान घेण्यात आले. आरोग्यदायी व तणावमुक्त जीवनासाठी योग महत्वपूर्ण आहे. यावेळी  वसंतराव काळे स्वाभिमान शिक्षण योजना समन्वयक प्रा. डॉ. गोविंद कोकणे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. जितेंद्र शिंदे, उपस्थित होते, तसेच धाराशिव मधील प्रतिष्ठित नागरिकांनी सहभाग नोंदविला. यावेळी सर्व उपस्थितांनी उत्साहाने सहभागी होऊन योगासने, प्राणायम आणि ध्यानाचा सराव केला.


 
Top