धाराशिव-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी मिलिंद बोरकर निवडणूक निरीक्षक
धाराशिव दि.२ जून (जिमाका) महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणूक -२०२६ अंतर्गत उस्मानाबाद- लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून श्री.मिलिंद बोरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.भारत निवडणूक आयोगाच्या १ जून २०२६ पत्रानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.
भारत निवडणूक आयोग,नवी दिल्ली यांच्या दि.१८ मे २०२६ रोजीच्या पत्रानुसार महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.त्यानुसार उस्मानाबाद- लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून श्री.मिलिंद बोरकर (भा.प्र.से.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मतदारसंघाशी संबंधित बाबींकरिता त्यांच्याशी मोबाईल क्रमांक ९९३०९९८९६९ वर संपर्क साधता येणार आहे.निवडणूक निरीक्षक श्री.मिलिंद बोरकर यांच्या राहण्याची व्यवस्था धाराशिवजवळील शिंगोली येथील सर्किट हाऊसमध्ये करण्यात आली आहे.
*************