रुईभर केंद्रातील सर्व शाळांना प्रत्येकी सहा हजाराची पुस्तके मोफत वाटप

समकालीन प्रकाशन संस्था पुणे व जागर वाचनाचा उपक्रम  

धाराशिव वार्ताहर 
                       
समकालीन प्रकाशन संस्था व जागर वाचनाचा यांच्या माध्यमातून व देणगीदार यांच्या सहकार्याने रुईभर तालुका धाराशिव या केंद्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना विद्यार्थी वाचनालयासाठी प्रत्येकी 6000 रुपये किमतीची पुस्तके आज अल्पसंख्यांक शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात माननीय शिक्षणाधिकारी डॉक्टर श्री रवींद्र खंदारे व गटशिक्षणाधिकारी श्री प्रकाश पारवे तसेच श्री लालासाहेब मगर व जिल्हा समन्वयक श्री बशीर तांबोळी यांचे हस्ते रुईभर केंद्रातील सर्व शाळांना पुस्तके मोफत वाटप करण्यात आले रुईभर केंद्रातील सर्व जिल्हा परिषद व खाजगी माध्यमांच्या वीस शाळांना सदर पुस्तके (एक लाख वीस हजार रुपये किमतीची) मोफत वाटप करण्यात आले यापूर्वी धाराशिव तालुक्यातील 11 केंद्रातील सर्व शाळांना मोफत पुस्तके वाटप करण्यात आली आहेत याप्रसंगी माननीय शिक्षणाधिकारी यांनी समकालीन प्रकाशन संस्था व देणगीदारांचे कौतुक करून त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील मुलांची वाचन संस्कृती वाढावी व शाळेतील मुले वाचनशील व्हावी यासाठी मोफत पुस्तके दिल्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करून सर्व मुख्याध्यापकांना आवाहन केले की सदर पुस्तके शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करून द्यावीत तसेच शिक्षकांनीही ही पुस्तके वाचावीत असे आवाहन केले, या प्रसंगी गट शिक्षण अधिकारी श्री प्रकाश पारवे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
 देणगीदार1) श्रीमती चारुशीला विवेक कुबल वडाळा मुंबई यांचे कडून एक संच 
2)श्रीमती मानशी करंदीकर मुलुंड मुंबई यांचे कडून एक संच 
3)श्री शशिकांत चितळे पुणे यांचे कडून एकूण नऊ संच 
4)श्रीमती संयोगीता मोडक पुणे यांचे कडून नऊ संच 
 असे एकूण प्रत्येकी सहा हजार रुपये किमतीचे वीस संच प्राप्त झाले होते. ते आज रुईभर केंद्रातील सर्व शाळा वरील मान्यवरंच्या हस्ते वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी श्री बाळासाहेब वाघमारे, सुरेश भालेराव, श्री प्रमोद शिंदे, श्री बालाजी भोसले,बापू कोळगे मारुती काळे, इलाही बागवान,शिवाजी साखरे, मालोजी वाघमारे, मिलिंद जानराव, महावीर गडदे यांच्यासह रुईभर केंद्रातिल जिल्हा परिषद व खाजगी माध्यमाचे सर्व मुख्याध्यपक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वयक श्री बशीर तांबोळी यांनी केले सूत्रसंचालन श्री मालोजी वाघमारे यांनी केले तर श्री बालाजी भोसले यांनी आभार मानले.
 
Top