तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शुक्रवार, दि. 19 जून रोजी येथील क्रांती चौकात पक्षाचा 60 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमास ज्येष्ठ नेते माधवअण्णा कुतवळ, युवा नेते ऋषिकेश मगर, ॲड. रामचंद्र ढवळे, राहुलजी खपले, सुधीर कदम, श्याम पवार, बापूसाहेब नाईकवाडी, बाळासाहेब शिंदे, संजय राऊत, दिनेश रसाळ, विकी वाघमारे, भरतआप्पा जाधव, सुनील जाधव, दादा इंगळे, अर्जुन साळुंखे, बाळासाहेब दरेकर, सुजित हंगरगेकर, गौरीशंकर कोडगिरे, जयकुमार दरेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवसेनेच्या 60 वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत पक्षसंघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. घोषणाबाजी व जल्लोषात वर्धापन दिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

 
Top