धाराशिव (प्रतिनिधी)-  दिवंगत पोलीस पाटील जयसिंग सरवदे रा. जि. धाराशिव हे कोरोना महामारीच्या काळामध्ये त्यांच्या गावातील कोरोना निर्मूलन दक्षता समितीमध्ये कार्य पार पाडत असताना त्यांचा दिनांक 10 एप्रिल 2021 रोजी कोरोना रोगाच्या साथीने मृत्यू झाला. कोविड 19 संबंधित कर्तव्य बजावत असताना कोविडमुळे मृत्यू होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना विमा कमवच म्हणून शासनाने सहानुग्रह अनुदान रुपये 50 लक्ष इतके देण्याचे शासन निर्णय जारी केले होते. त्या अनुषंगाने रक्कम रुपये 50 लक्ष रुपयाचा धनादेश त्यांची वारसदार पत्नी सरवदे यांना  दि.23 जून 2026 रोजी  पोलीस अधीक्षक धाराशिव रितु खोखर यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला. यावेळी त्यांच्या समवेत धाराशिव जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष व पोलीस अधीक्षक कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक सुनील बाबर हे उपस्थित होते.

 
Top