धाराशिव (प्रतिनिधी)- आज दि. 1 मे 2026 रोजी बुद्ध पौर्णिमेच्या मंगल दिनी धाराशिव शहरातील नगर परिषद हद्दीतील सर्वे नं 43 मधील श्री. लक्ष्मण शिवाजी बनसोडे, श्री. विनोद भाऊसाहेब बनसोडे व श्री. सुरज तानाजी बनसोडे यांच्या मालकी हक्काच्या जमिनीत त्यांनी शासन नियमाप्रमाणे 2 फायनल लेआऊट मंजूर केले. त्यामध्ये निर्माण झालेल्या वसाहतीला एक सुंदर नांव असावे असे मत सध्या या भागात रहात असलेले श्री.गौतम मोटे यांनी मांडले, तसेच टे पुढे म्हणाले प्लॉट मालकाच्या पुर्वज्यांच्या नावाचा उल्लेख व्हावा जसे की क्र. 1 लेआऊट च्या वसाहतीला ‘ पवित्राई कॉलनी’ कुरणे नगर, धाराशिव व क्र. 2 च्या लेआऊट ला ‘ शिवजिजाई कॉलनी’ कुरणे नगर, धाराशिव ही नावे देण्यात यावी असे मत मांडले, तसेच या भागात रहात असलेल्या बहुसंख्य रहिवाशांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. त्यानुसार उपरोक्त ‘ पवित्राई कॉलनी’ कुरणे नगर, धाराशिव व ‘शिवजिजाई कॉलनी’ कुरणे धाराशिव, या नावे नामफलक उभरण्यात आले. तसेच 1 मे 2026 रोजी बुद्ध पौर्णिमेच्या मंगल दिनी तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून आयु. कमल मारुती घरबूडवे (जमीन मालकांची मोठी भगिनी) यांच्या हस्ते फीत कापून नामफलकाचे उदघाटन करण्यात आले. सोबत प्लॉट मालक
आयु. लक्ष्मण शिवाजी बनसोडे, आयु. विनोद भाऊसाहेब बनसोडे, आयु. सुरज तानाजी बनसोडे उपस्थित होते.
त्याच बरोबर प्रतिष्ठित नागरिक अलंकार बनसोडे, नंदकुमार हावळे, सचिन गायकवाड, संतोष बनसोडे, यशवंत सपकाळ, सिद्धार्थ बनसोडे, बालाजी शितोळे, सचिन दिलपाक, आनंद गाडे, अक्षय बनसोडे, महादेव जोगदंड, गौतम मोटे, किरण सोनवणे, मॉन्टी बनसोडे, जानराव, विश्वजित बनसोडे, रोहन बनसोडे, स्वप्नील घरबूडवे, आकाश बनसोडे, कृष्णा सोलंकर सुरेखा बनसोडे, लता बनसोडे, बायडा बनसोडे, मंगल बनसोडे, दिक्षा बनसोडे, नागीन बनसोडे, पल्लवी बनसोडे, प्रतीक्षा बनसोडे, मनिषा सोनावणे, मनिषा देशमुख,विनोक्ष बनसोडे तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
