भुम (प्रतिनिधी)-:  शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. भूम तालुक्यातील त्रिंतज येथील एका शेतकऱ्याने  कांद्याच्या घसरलेल्या दराची अवस्था बघून आपल्या शेतातील काढणी काढून ठेवलेला अडीच एकर वरील 600 गोणी कांदा हा पेटून दिल्याची धक्कादायक घटना झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे बाजारभाव सातत्याने कोसळत असून,  यामुळे शेतकरी वर्ग पुरता कोलमडून गेला आहे. दुसऱ्या बाजूला उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे. यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांने आपल्या शेतातीलच कांदास शेतात आग लावून दिली आहे. 

भूम तालुक्यातील तिंत्रज येथील कांदा उत्पादक शेतकरी भगवान साबळे यांनी आपल्या स्वतः च्या शेतात 4 एकर उन्हाळी कांदा लागवड करण्यात आली होती. यामधील त्यानी अडीच एकर वरील कांदा हा काढणी काढून शेतात चांगल्या दराच्या प्रतिक्षेत ठेवला होता. मात्र मागील काही दिवसापासून कांद्याच्या दारात मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. या कमी दरामुळे व कांद्यास सध्या मिळत असलेल्या 50 पैसे, 1 रूपये, आदी असा कवडीमोल दर मिळत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून तिव्र संताप व्यक्त केला जात आहे. लाखो रुपये यासाठी शेतकऱ्यांकडून खर्च केला जात आहे मात्र शेतकऱ्यांच्या हातात दमडी हि पडत नाही. उलट शेतकऱ्यांना पदरचे पैसे देण्याची दुदैवी वेळ येत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी वर्ग पुरता हतबल झाला आहे. यातूनच या कांदा उत्पादक शेतकरी भगवान साबळे यांनी आपल्या शेतातील अडीच एकर वरील काढणी काढून ठेवलेल्या कांद्यास पेटून देवून आग लावण्यात आली.यामुळे या अडीच एकर वरील 600 गोण्या ची राखरांगोळी झाली आहे. या कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांचा सुमारे 3 ते 4 लाख खर्च झाला होता. तो हि या सध्या च्या दरामुळे मातीमोल झाला आहे. शासनाने याकडे गांभीर्याने पाहत या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान किंवा काही मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. 


 
Top