भुम (प्रतिनिधी)- नरसापुर जि. पुणे येथे अल्पवयीन निष्पाप मुलीवर अत्याचार करुन निर्घृण हत्ये केलेल्या घटनेचा भूम तालुका ब्राम्हण संघटना यांच्या वतीने निषेध करत या प्रकरणी आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करत उपविभागीय अधिकारी यांची भेट घेवुन दि. 4 मे रोजी सकाळी ब्रम्हवृदांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

सकाळी 11 वाजता तालुक्यातील सकल ब्राम्हण समाजील युवक जेष्ठ नागरिक व संघटना पदाधिकारी यांनी या घटनेचा निषेध केला. अशा अत्याचाराच्या घटना भविष्यात पुन्हा घडु नये यासाठीं सरकारने कडक पाउले उचलावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी सदर प्रकरणाची निष्पक्ष सखोल व जलद तपास करण्यात यावा, अरोपीवर कठोर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन कडक शिक्षा द्यावी. प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात चालवुन पिडीतास न्याय मिळावा, पिडीत कुटुंबास आर्थीक मानसिक अधार व मदत द्यावा, अशा घटना पुन्हा घडु नयेत यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत. अन्यथा आगामी काळात भूम तालुका ब्राम्हण संघटना यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल.

यावेळी हभप. अरुण शाळु महाराज, जिल्हा संघटना पदाधिकारी विलास शाळु, ए. पी. देशपांडे, भूम तालुका ब्राम्हण संघटना अध्यक्ष सुधिर देशमुख, लक्ष्मीकांत देशमुख, भगवंत देशमुख, आनंद बेलसरे, मनोज क्षिरसागर, गोटु तेरकर, मनिष राजोपाध्ये, श्रीपाद देशमुख, किरण कुलकर्णी, विजयकुमार देवडीकर,उमाकांत वासकर, उदय कुलकर्णी, हेमंत देशमुख, सचिन बारगजे, गोपाळ व्यवहारे,सुमंत देशमुख ,सुरेश वैद्य , विधिज्ञ संजय शाळु ,मयुर शाळु ,नारायण आरगडे तुषार कुलकर्णी ,यांच्यासह सकल ब्राम्हण समाजाचे नागरिक उपस्थित होते.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top