धाराशिव (प्रतिनिधी)- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयी व फरारी आरोपी शोध तसेच अवैध धंद्यावर कारवाई करीता पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुपनीय माहिती मिळाली. त्या अधारे इनोव्हा कार व विदेशी दारूच्या बाटल्या अशा एकूण 6 लाख 34 हजार 600 रूपयाचा माल जप्त केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, इनोव्हा कार क्र एमएच 15 बीएक्स 6820 मधून अवैध दारुची चोरटी वाहतुक करणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने नमुद ठिकाणी जावून थांबले. त्यावेळी येडशी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पथकास कार येताना दिसली. पथकाने तिला थांबवून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुभाष भिमराव/लाला काळे, वय 33 वर्षे, रा.कन्हेरवाडी ता. कळंब जि. धाराशिव असे सागिंतले. पथकाने कारची पाहणी केली असता एक इसम पाठीमागे शिटवर बसलेला दिसला. त्यास त्याचे नाव गाव विचारले असतान त्याने त्याचे नाव दादा रामा काळे, वय 46 वर्षे, रा. जुना बस डेपो पारधी पिढी ता. जि. धाराशिव असे सागिंतले. त्यावर पथकाने पाठीमागील सिटची पाहणी केली असता विदेशी दारुचे बॉक्स दिसुन आले. सदर इनोव्हा कार व मुद्देमाल असा एकुण 6 लाख 34 हजार 600 रूपये किंमतीचा जप्त करुन आरोपी नामे सुभाष भिमराव काळे, दादा रामा काळे, यांचे विरुध्द म.दा.का कलम 65(ई) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक रितु खोखर, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार, सपोनि अमोल मोरे, पोह बळीराम शिंदे, अमोल चव्हाण, चालक पोकॉ दहीहांडे यांचे पथकाने केली आहे.
