धाराशिव (प्रतिनिधी)- अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत दाखल खून अथवा अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसास शासकीय अथवा निमशासकीय नोकरी देण्याची तरतूद शासनाने केली आहे.त्यानुसार संबंधित पात्र वारसांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचारास प्रतिबंध अधिनियम 1989 तसेच सुधारित अधिनियम 2015 अंतर्गत दाखल खून किंवा अत्याचाराच्या अनुषंगाने झालेल्या मृत्यूच्या प्रकरणातील दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसास शासकीय किंवा निमशासकीय नोकरी देण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे.

याअंतर्गत भूम पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक 262/2024, दि.26 नोव्हेंबर 2024 मधील खून प्रकरणात मयत भाऊसाहेब ऊर्फ भावडया गुलच्या काळे,रा.खटाळवस्ती,वालवड,ता. भूम,जि.धाराशिव यांचा 25 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता.या प्रकरणात शासन निर्णयातील तरतुदीनुसार त्यांच्या पात्र वारसदारास शासकीय अथवा निमशासकीय नोकरी देण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

त्यामुळे भाऊसाहेब ऊर्फ भावडया गुलच्या काळे यांच्या पात्र वारसदारांनी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रांसह समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात उपस्थित राहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.अर्जासोबत नोकरीसाठीचा अर्ज,रेशन कार्ड,रहिवासी दाखला, शैक्षणिक कागदपत्रे,जातीचा दाखला,संमतीपत्र तसेच कुटुंब सांभाळण्याचे प्रतिज्ञापत्र आदी कागदपत्रे सादर करावीत. संबंधितांनी कार्यालयीन वेळेत दि. 28 मे 2026 पर्यंत उपस्थित राहावे, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण धाराशिव येथील सचिन कवले यांनी कळविले आहे. 

 
Top