धाराशिव (प्रतिनिधी)- अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारतीच्या देवगिरी प्रांताध्यक्षपदी सुप्रसिध्द साहित्यिक प्रा. डा. सर्जेराव जिगे यांची तर कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार उमेश काळे, प्रांत महामंत्रीपदी धाराशिवचे जेष्ठ साहित्यिक युवराज नळे यांची निवड करण्यात आली.
देवगिरी प्रांत कार्यकर्त्यांची शनिवारी (दि. 9) आभासी बैठक झाली. या बैठकीला मराठवाडा आणि खानदेशातील शंभरावर प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत प्रदेश संघटनमंत्री नितीन केळकर, प्रदेश कार्याध्यक्ष शशीकांत घासकडबी, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. रवींद्र बेंबरे यांनी मार्गदर्शन केले. प्रांताचे माजी अध्यक्ष प्राचार्य संजीव गिरासे यांनी मनोगत मांडले. प्रांत कार्यकारिणीची घोषणा नितीन केळकर केली.
नूतन प्रांत कार्यकारिणी अशी ं
अध्यक्ष प्रा. डॉ. सर्जेराव जिगे, छत्रपती संभाजीनगर, कार्याध्यक्ष उमेश काळे, छत्रपती संभाजीनगर, प्रांत महामंत्री युवराज नळे, धाराशिव. उपाध्यक्ष प्रा. डॉ.राजीव यशवंते, हिंगोली, द. ल. वारे, बीड, कोषाध्यक्ष डॉ. नागेश अंकुश, छत्रपती संभाजीनगर,. कार्यालय मंत्री विलास फुटाणे, छत्रपती संभाजीनगर, युवा विभाग प्रा. डॉ. रमेश रावळकर, छत्रपती संभाजीनगर, लोकसाहित्य विभाग . प्रा. डॉ. योगेश पाटील, धुळे, बाल साहित्य विभाग संगीता धारूरकर, छत्रपती संभाजीनगर,प्रचार, प्रसिद्धी, सोशल मीडिया प्रा डॉ. सुहास सदाव्रते, जालना, महिला विभाग - प्रा. डा. उषा शर्मा, जळगाव, अनुराधा पत्की नांदेड.


