परंडा (प्रतिनिधी)- पत्रकार निसारभाई मुजावर यांना अपशब्द वापरल्याबद्दल नगर परिषद कर्मचाऱ्याला निलंबित करावे या मागणीसाठी आज पुकारण्यात आलेल्या परंडा शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

आज सकाळपासून परंडा शहरातील व्यापारी  प्रतिष्ठाने बंद राहिली. रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता. शहराच्या सर्व भागातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. आंदोलकांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले.  निवेदनात म्हटले आहे की परंडा शहरातील पत्रकार निसारभाई मुजावर यांना नपा कर्मचारी जगदीश सोंडगे याने अपशब्द वापरले असून या प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. सदरील कर्मचाऱ्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे याची दखल प्रशासनाने घ्यावी.


 
Top