धाराशिव (प्रतिनिधी)-  युवा सेनेचे धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख किरण गायकवाड व लातूर जिल्हा संपर्कप्रमुखपदी ॲड. आकांशा चौगुले यांनी दोन्ही जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ वाईज संपर्कप्रमुखांची निवड केली आहे. युवा नेते अभिराम सुधीर पाटील यांची धाराशिव-कळंब  विधानसभा संपर्कप्रमुखपदी निवड झाली आहे. त्या निवडीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पक्ष संघटना वाढीसाठी त्यांची निवड ही महत्त्वाची मानली जात आहे.

उमरगा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदी शरद पवार यांची निवड करण्यात आली आहे. तर तुळजापूर विधानसभा संपर्कप्रमुखपदी गणेश रोचकरी यांची निवड करण्यात आली आहे. तर बार्शी विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुखपदी आनंद यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदी गणेश सुरवसे तर लातूर शहर विजय कसपटे, अहमदपूर विधानसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदी सुरज मधुकर पाटील यांची निवड करण्यात आली आहे. उदगीर व निलंगा विधानसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदी विक्रम केंद्रे व राहुल बिराजदार यांची निवड करण्यात आली आहे. तर लोहा विधानसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदी कुलदीप सुर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे. 


 
Top