तुळजापूर (प्रतिनिधी)-जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर तुळजापूर येथील एसटी कर्मचाऱ्यांच्या कन्येने दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तुळजापूर विभागीय एसटी महामंडळ कार्यालयात कार्यरत असलेले कर्मचारी केरबा सुरवसे यांची कन्या श्रावणी केरबा सुरवसे हिने दहावी परीक्षेत 91.20 टक्के गुण मिळवत घवघवीत यश मिळवले आहे.
श्रावणीने परीक्षेत 497+7 गुण प्राप्त करत आपल्या कुटुंबासह शाळेचे आणि तुळजापूर शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या या यशामुळे सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सध्या श्रावणी ही संभाजीनगर येथील A. Kru. Waghmare School येथे शिक्षण घेत आहे. शालेय जीवनापासूनच अभ्यासात सातत्य ठेवत तिने हे यश संपादन केल्याचे तिच्या शिक्षकांनी सांगितले.
मेहनतीला यशाची जोड
एसटी महामंडळात कार्यरत असलेल्या वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत श्रावणीने नियमित अभ्यासावर भर दिला. कठोर परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा यामुळे हे यश मिळाल्याची भावना तिने व्यक्त केली.
सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव
श्रावणीच्या यशाबद्दल नातेवाईक, शिक्षक, मित्रपरिवार तसेच एसटी कर्मचारी वर्गातून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनीही मेहनतीच्या जोरावर मोठे यश मिळवू शकते, हे श्रावणीने आपल्या निकालातून दाखवून दिल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
