भूम (प्रतिनिधी)- पावसाळ्यापूर्वी जलसंधारण व भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने भूम तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या जलतारा योजनेची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. आतापर्यंत तालुक्यात एकूण 143 जलतारा प्रकल्प पूर्ण करण्यात आले असून उर्वरित कामेही वेगाने सुरू आहेत.
धाराशिव जिल्ह्यात जलसंधारण व पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी दिले आहेत. त्यानुसार भूम तालुका प्रशासनाने पूर्ण झालेले प्रकल्प अंतरवली 36, तिन्त्रज 32, दांडेगाव 35, जेजला 18, आंबी 22, विभागांच्या समन्वयातून जलतारा योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून हवामानातील असमतोल प्रकर्षाने जाणवत असून कधी कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती, तर कधी अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होत आहे. गतवर्षी अतिवृष्टीमुळे
नद्यांना पूर येऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, एवढा पाऊस पडूनही विहिरी, बोअरवेल तसेच जलप्रकल्पांतील पाणी पातळी झपाट्याने घटल्याचे दिसून आले. साठवण या पार्श्वभूमीवर भूजल पातळी वाढविणे, पाण्याची क्षमता मजबूत करणे व शेतीसाठी कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता निर्माण करणे हा जलतारा योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेमुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी होण्यास मदत होणार असून उन्हाळा तसेच आपत्कालीन परिस्थितीत शेतीसाठीही पाण्याचा मोठा आधार मिळणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 'नाम फाउंडेशन'चेही सहकार्य लाभत असल्याचे प्रशासनाने सांगितले.
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी गावातील सहायक कृषी अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी तसेच ग्राम रोजगार सेवक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार जयवंत पाटील यांनी केले. तालुक्यात तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जलतारा प्रकल्प करून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.