धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील श्रीपतराव भोसले हायसकूलची विद्यार्थिनी ईश्वरी संजय भोसगे हिने यंदाच्या दहावीच्या परिक्षेत 92.40 टक्के गुण घेवून सुयश मिळविले आहे.

ईश्वरी संजय भोसगे ही शहरातील गणेश नगर येथील रहिवाशी तात्याराव आपचे यांची नात असून आजोबांनी लहानपणापासून आजवर तिला गुणवत्तेचे शिक्षण मिळण्यासाठी मोठ्या जिद्दीने स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न केले. अथक परिश्रमातून  ईश्वरीने सुयश मिळविल्याबद्दल तिचे श्रीपतराव भोसले हायस्कूलचे मुख्याध्यापक, संस्थाध्यक्ष सुधीर पाटील व संचालकांनी तसेच आपचे कुटुंबीय व नातेवाईकांकडून अभिनंदन होत आहे.


 
Top