तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.  

यावेळी बार्शी येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार जयकुमार शितोळे , महाराष्ट्र संत विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.के.बेदरे होते.यावेळी पंचायत समिती सदस्या जया नाईकवाडी, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अविनाश पाडुळे,एन.बी.आगलावे,जी.ऐ.चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी एन.बी.आगलावे, सतीश रोहीदास,जे.के.बेंदरे, श्रद्धा वराळे यांनी आपले विचार व्यक्त केले.प्रास्ताविक एस.एस.बळवंतराव यांनी केले तर सूत्रसंचालन बी.डी.कांबळे यांनी केले. यावेळी महाराष्ट्र संत विद्यालयातील दहावीमध्ये  श्रद्धा वराळे, वेदांत फंड,प्राची कोकरे,प्रिया हेगडकर,त्रिद्धी आंधळे,राजनंदिनी पांढरे,गौरीवी रोहीदास तर बारावीमध्ये आयेषा काझी, दिव्या कदम, वैष्णवी ढगे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच 

महाराष्ट्र संतविद्यालयातील एस.एस.बळवंतराव,बी.डी.कांबळे,एस.यू.गोडगे,दिलीप पालकर,ऐ.एन.रणदिवे,प्रा.सुनिल लुगडे, प्रा.जयदिप चव्हाण,प्रा.सतिष भालेराव ,प्रा.सुनिल पाटील,प्रा.राहूलदेव वाघमारे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.


 
Top