धाराशिव (प्रतिनिधी)- येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) जिल्हा कार्यालयात आज पक्षप्रवेशाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पद्मविभूषण खासदार शरदचंद्र पवार यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) मध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी सुशांत बनसोडे, दत्तात्रय वाघमारे, सुमित रणकाम, अरिफ शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. नव्याने पक्षात दाखल झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. तसेच त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमास प्रदेश सरचिटणीस जावेद खैरडी, जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील, जीवनराव गोरे, राष्ट्रीय अध्यक्ष युवती सक्षना ताई सलगर, मसूद भाई शेख, कादरभाई खान, युवक जिल्हाध्यक्ष शेखरजी घोडके, महिला जिल्हाध्यक्ष मनीषाताई पाटील, शहराध्यक्ष तथा नगरसेवक बबलू शेख, कळंब तालुकाध्यक्ष प्रा. तुषार वाघमारे, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ. अविनाश तांबारे, ज्योतीताई माळाळे, रमेश देशमुख, अहमद काजी, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तोफिक भाई शेख, नगरसेवक सुनील आंबेकर, नगरसेवक पंकज भोसले, नगरसेवक सर्फराज कुरेशी, नगरसेवक नर्सिंग मेटकरी, नगरसेवक इजाज काजी, शिक्षक सेल जिल्हाध्यक्ष प्रा. जालिंदर पोळ, अभियंता सेल जिल्हाध्यक्ष सुरज वडवळे, ॲड. योगेश सोन्नेपाटील, लीगल सेल जिल्हाध्यक्ष ॲड. अविनाश जाधव, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष दत्ताजी राऊत, शहर उपाध्यक्ष हेमंत भोरे, असिफ शेख, सुरज सुकळे, अनिल जाधव, संघटित कामगार सेल जिल्हाध्यक्ष सरफराज पटेल, असंघटित कामगार सेल जिल्हाध्यक्ष उमेश शिरसाटे, मलंग शेख, माजी नगरसेवक बाबा मुजावर, लीगल सेल तालुका अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आव्हाड, लीगल सेल शहराध्यक्ष किरण रोकडे, वैद्यकीय मदत जिल्हाध्यक्ष डॉ. सय्यद फाद, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कसबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. आगामी काळात सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी नवप्रवेशित कार्यकर्ते सक्रियपणे कार्य करतील, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
