तुळजापूर (प्रतिनिधी)-  राजा शिवाजी चित्रपटाच्या प्रदर्शनाचे औचित्य साधत अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख या दांपत्याने श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या श्री तुळजाभवानी देवींची आरती करत त्यांनी पारंपरिक पद्धतीने कुलधर्म व कुलाचार केले.

विशेष म्हणजे, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने रितेश देशमुख दिग्दर्शित आणि जेनेलिया देशमुख निर्मित ‌‘राजा शिवाजी‌’ हा छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित असलेला चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या यशासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी असलेल्या श्री तुळजाभवानी देवींच्या आशीर्वादासाठी त्यांनी देवीच्या चरणी नतमस्तक होत प्रार्थना केली.

 
Top