धाराशिव (प्रतिनिधी)-  देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी संबंधित असलेली ‌‘नीट' परीक्षा रद्द करण्याचा निर्णय हा केंद्र सरकारच्या निष्काळजी, बेजबाबदार आणि अपयशी कारभाराचे प्रतीक आहे.नीट' पेपरफुटी प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच विद्यार्थ्यांना मानसिक व शैक्षणिक दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने विशेष उपाययोजना जाहीर कराव्यात, अशी मागणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या कडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रदेश सचिव डॉ. स्मिता शहापूरकर यांनी केली आहे.  

डॉ. शहापूरकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने 2026 ची नीट परीक्षा रद्द करून देशातील 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ मांडला आहे. मागील 12 वर्षांपासून देशातील विविध स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियांमध्ये पेपरफुटी, गैरव्यवहार आणि शिक्षण घोटाळ्यांच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्यापासून ते नुकत्याच समोर आलेल्या ‌‘नीट' प्रश्नपत्रिका गळतीपर्यंत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणारे प्रकार घडत असूनही केंद्र सरकारकडून कोणतीही ठोस आणि प्रभावी कारवाई होताना दिसत नाही. परीक्षा रद्द करण्यापलीकडे सरकार काहीच करत नाही.

‌‘नीट' पेपरफुटी प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच विद्यार्थ्यांना मानसिक व शैक्षणिक दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने विशेष उपाययोजना जाहीर कराव्यात, अशी मागणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या कडे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिव डॉ. स्मिता शहापूरकर यांनी केली आहे.

 
Top