तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील मध्यवर्ती अशा दीपक चौक परिसरात शनिवारी मध्यरात्री दोन तरुणात वाद होऊन यात एका तरुणावर धारदार शास्त्राचा हल्ला झाल्याने याचा उपचारादरम्यान मरण पावल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेने तीर्थक्षेत्र तुळजापुरात एकच खळबळ उडाली आहे. मृत युवकाचे नाव कृष्णा आनंत रसाळ (वय 19, रा. एस.टी. कॉलनी, तुळजापूर) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे दोन महिन्यांपूर्वी काही व्यक्तींमध्ये झालेल्या भांडणात कृष्णा रसाळ यांनी मध्यस्थी केली होती. याचा राग मनात धरून हा हल्ला झाल्याचे समजते दि. 2 मेच्या रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दीपक चौक येथे कृष्णा रसाळ व अज्ञात व्यक्तीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. सुरुवातीला सामान्य भांडण वाटणारा हा वाद अचानक विकोपाला गेला आणि त्याचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले. संतापाच्या भरात अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने कृष्णा रसाळ यांच्या गळ्यावर वार केला हवा एवढा वर मी बसला की त्यातून त्याचा प्रचंड रक्तस्त्राव झाला. यानंतर त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता उपचार चालू असताना सकाळी मरण पावला. घटनेनंतर तुळजापूर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पोलीस प्रशासनाचा वचक कमी झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
