धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) धाराशिव जिल्हा अल्पसंख्याक विभागाची आढावा बैठक आज जिल्हा कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. संघटन बळकटीकरण, आगामी राजकीय रणनीती तसेच विभागीय कामकाजाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीस निरीक्षक म्हणून जावेद खरेदी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच जीवनरावजी गोरे, राष्ट्रीय अध्यक्ष युवती सक्षनाताई सलगर, जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील, जिल्हाध्यक्ष तोफिक भाई शेख यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक यशस्वीरित्या पार पडली. अल्पसंख्याक विभागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.

बैठकीदरम्यान प्रदेश सरचिटणीस मसूद भाई शेख, कादरभाई खान, युवक जिल्हाध्यक्ष शेखरजी घोडके, महिला जिल्हाध्यक्ष मनीषाताई पाटील, शहराध्यक्ष तथा नगरसेवक बबलू शेख, कळंब तालुकाध्यक्ष प्रा. तुषार वाघमारे, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ. अविनाश तांबारे, ज्योतीताई माळाळे, रमेश देशमुख, अहमद काजी, नगरसेवक सुनील आंबेकर, पंकज भोसले, सर्फराज कुरेशी, नर्सिंग मेटकरी, इजाज काजी, शिक्षक सेल जिल्हाध्यक्ष प्रा. जालिंदर पोळ, अभियंता सेल जिल्हाध्यक्ष सुरज वडवळे, ॲड. योगेश सोन्नेपाटील, लीगल सेल जिल्हाध्यक्ष ॲड. अविनाश जाधव, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष दत्ताजी राऊत, शहर उपाध्यक्ष हेमंत भोरे, असिफ शेख, सुरज सुकळे, अनिल जाधव, संघटित कामगार सेल जिल्हाध्यक्ष सरफराज पटेल, असंघटित कामगार सेल जिल्हाध्यक्ष उमेश शिरसाटे, मलंग शेख, माजी नगरसेवक बाबा मुजावर, लीगल सेल तालुका अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आव्हाड, लीगल सेल शहराध्यक्ष किरण रोकडे, वैद्यकीय मदत जिल्हाध्यक्ष डॉ. सय्यद फाद, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कसबे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

बैठकीत अल्पसंख्याक विभागाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी विविध उपाययोजना, कार्यकर्त्यांचे प्रबोधन, तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांनी पक्षाच्या धोरणांनुसार जनतेपर्यंत पोहोचण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीच्या शेवटी जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व पक्ष बळकटीसाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.


 
Top