धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथे हिंदराष्ट्र ऑर्गनायझेशन संस्थेच्या वतीने राष्ट्र चिंतन अभियान अंतर्गत येत्या शुक्रवारी 8 मे 2026 रोजी विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात कृषी शिक्षण आणि आरोग्य या तीन महत्त्वाच्या विषयावर सखोल मार्गदर्शन आणि चर्चा होणार आहे. हे चर्चासत्र धाराशिव मधील माऊली चौकातील अंबुरे निवास येथे सायंकाळी 5 ते 7 या वेळेत संपन्न होईल. 

या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून गज अरविंद उपस्थित राहणार आहेत. तरी त्यांचा मार्गदर्शनाचा लाभ परिसरातील व शहरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन हिंद राष्ट्र ऑर्गनायझेशनच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राधाताई सपकाळ यांनी केले आहे. या चर्चासत्रात कृषी, शिक्षण, आणि आरोग्य याबाबत मान्यवर आपापली मते मांडणार आहेत. या चर्चासत्रात नागरिकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी प्रश्नोत्तराचे सत्रही आयोजीत केले आहे. यामध्ये उपस्थित नागरिकांच्या प्रश्नाचे निरसन केले जातील. राष्ट्रीय उभारणीस आरोग्य, कृषी व शिक्षण हे तीन आधारस्तंभ आहेत. या विषयावर जनजागृती व्हावी आणि सामान्यांच्या समस्यांना  व्यासपीठ मिळावे या उद्देशाने या चर्चासत्राचे आयोजन केलेले आहे. या महत्वपूर्ण चर्चासत्राला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन आयोजकांच्या वतीने जिल्हाध्यक्षांनी केले आहे.


 
Top