मुरुम (प्रतिनिधी)- दि .06 मे 2026 रोजी श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर येथे 53 महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूरच्या वार्षिक प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ झाला असून सदर शिबीर 05 ते 14 मे 2026 पर्यंत चालणार आहे.या कँपचे कँप कमांडंट कर्नल संतोष नवगण ,डेप्युटी कँप कमांडंट वाय.बी.सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी कँप चालणार आहे . कॅडेसटना विविध प्रकारचे सैनिकी प्रशिक्षण दिले जाणार आहे. या वार्षिक प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना कर्नल संतोष नवगण यांनी एनसीसी कॅडेटना एकता व अनुशासन याचे पालन करून राष्ट्र निर्मिती देशाच्या सामाजिक विकासासाठी एनसीसी कॅडेट यांनी आपले योगदान द्यावे असे आवाहन केले. या कॅम्पसाठी श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयचे प्राचार्य घोडके व्ही बी यांनी कँपसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम आभार मानले.
या कँपचा मुख्य उद्देश 26 जानेवारी 2027 मध्ये होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी एनसीसी कॅडेट्सची निवड तसेच दिल्ली येथे होणाऱ्या थल सैनिक कँपसाठी निवड केली जाणार आहे .या एनसीसी कॅडेट्सना ड्रिल ,फायरिंग,सांस्कृतिक कार्यक्रम,फ्लॅग एरिया,खेळ , ऑब्सिटिकल , सायबर क्राईम ,बेस्ट कॅडेट,अग्निशमक , आपती निवारण, आरोग्य सुरिक्षितता इत्यादी विषयाचा सराव करून प्रशिक्षण दिले जाणार आहे .या कॅम्प दरम्यान कॅडेट्सना सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन त्याचबरोबर विविध खेळाचे आयोजन केले आहे. या कँपमध्ये लातूर व धाराधिव जिल्ह्याचे शाळा व महाविद्यालयातील जवळपास 450 एनसीसी कॅडेटस सहभागी झाले आहेत.या कॅम्पच्या यशस्वीतेसाठी सुभेदार मेजर शंभू सिंह,कॅप्टन डॉ चिट्टमपल्ले ज्ञानेश्वर,लेफ्टनंट हरिभाऊ पावडे, घोरपडे अमरसिंह, कुंभार व्ही बी, राजोळे सचिन ,संतोष पाटील ,हरेंदर सिंग,संजय चिकने,देशराज सिंह,बाजीराव पाटील, सुनिल काळे तसेच कार्यालयीन हेड क्लर्क घोगरे बी व्ही , पवार आर आर आर्मी स्टाफ , कार्यालयीन कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत .
