भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील डोकेवाडी येथील एका शेतकरी तरुना ने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. मराठा आरक्षणासाठी डोकेवाडी गावातून येथील शेतकरी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या तरूणाने त्याच्या स्वतःच्या राहत्या घरी वरील मजल्यावर लोखंडी अँगला गळफास घेवून आपले जीवन संपवल्याचं समोर आलं आहे.
मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. हा तरुण मुंबई, बीड, धाराशिव,येथील मराठा मोर्चा व इतर ठिकाणी झालेल्या मोर्चामध्ये त्याने सहभाग नोंदवला होता. या घटनेमुळे भूम तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. मराठा आरक्षणासाठी आजपर्यंत अनेक तरुणांनी आपलं जीवन संपवलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, या चिंतेत 25 वर्षीय शेतकऱ्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना भूम तालुक्यातील डोकेवाडी गावात दिनांक 22 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. पोलिसांना येथील आनंद आहेर यांनी खबर दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गळफास घेतल्यानंतर थोडा जीव आहे. असे भासल्यानंतर त्यांनी मयत व्यक्तीस ईट येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी घेऊन गेले होते. परंतु त्या ठिकाणच्या डॉक्टरांनी त्यास मयत असल्याचे घोषित केले. पोलिसांना त्याच्या खिशामध्ये कर्जबाजारी पणा व नापिकीला कंटाळून व मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे मी आत्महत्या करत आहे. अशा आशयाची चिठ्ठी मिळून आली. सदर प्रकरणी वाशी पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पद्माकर अशोक आहेर वय 25 वर्ष असं आत्महत्या करणाऱ्या इसमाचं नाव आहे. वडील ही शेतकरी होते. मराठा समाजाच्या आंदोलनात त्याचा सक्रिय सहभाग होता. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. स्वतःच्या मुलाला आरक्षण मिळत नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळेल का नाही, या चिंतेत पद्माकर आहेर होते, असं त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. वाशी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वीही मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळे अनेक तरूणांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. या मयत तरुणाच्या खिशात नापीकी, मराठा आरक्षण मिळावं, अशा आशयाचा मजकूर लिहिलेली एक चिठ्ठी आढळून आली होती. त्यामध्ये असं लिहले आहे की, कर्जबाजारीपणाला व नापिकीला कंटाळून व मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे मी आत्महत्या करत आहे अशा आशयाचा मजकूर लिहून ठेवण्यात आला होता. त्याच्या पश्चात आई, वडील,पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.
