धाराशिव (ंप्रतिनिधी)- टपाल विभागाची “ फ्रँचायझी 2.0“ योजना - जनतेसाठी अधिक सुलभ व जलद टपाल सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भारतीय टपाल विभागामार्फत नागरिकांना अधिक वेगवान,सुलभ व जवळच्या ठिकाणी टपाल सेवा उपलब्ध करून देण्यासाठी “फ्रँचायजी 2.0“ योजना सुरू करण्यात आली आहे.या योजनेद्वारे स्थानिक उद्योजक, दुकानदार व इछुक व्यक्तींना अधिकृत फ्रँचायझी भागीदार म्हणून कार्य करण्याची संधी उपलब्ध होत असून,टपाल सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येत आहे.
योजनेची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे
या योजनेअंतर्गत स्पीड पोस्ट, नोंदणीकृत टपाल,पार्सल बुकिंग व टपाल वितरण सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जलद व कार्यक्षम सेवा देण्यावर भर देण्यात आला आहे.यामुळे स्थानिक युवकांसाठी स्वयंरोजगाराची संधी निर्माण होणार असून ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये टपाल सेवांचा विस्तार होणार आहे.तसेच टपाल विभागाच्या देखरेखीखाली विश्वसनीय सेवा नागरिकांना मिळणार आहे.
कोण अर्ज करू शकतो
आवश्यक जागा,मूलभूत सुविधा व निर्धारित पात्रता असलेले इछुक नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतात.इच्छुकांनी आपल्या जवळच्या मुख्य टपाल कार्यालयाशी किंवा विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा.
फ्रँचायजी 2.0 ही योजना टपाल सेवांचा विस्तार,डिजिटल सक्षमीकरण आणि रोजगारनिर्मिती यांचा प्रभावी संगम आहे.या योजनेमुळे टपाल सेवा अधिक लोकाभिमुख व परिणामकारक होणार असून,सर्व इच्छुकांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन श्री यस.पी.मालकर,अधीक्षक डाकघर धाराशिव विभाग,धाराशिव यांनी केले आहे.